बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी देण्यात येणार”

मुंबई | मराठा आरक्षण (Maratha reservation)आंदोलनावेळी काही आंदोलकांनी  स्वत:च्या प्राणांचा देखील विचार केला नव्हता. मराठा आंदोलनात 30 पेक्षा अधिक आंदोलकांनी बलिदान दिलं. यापुर्वी राज्य सरकारकडून आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांना  प्रत्येकी 10 लाखांचं अर्थसाहाय्य करण्यात आलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनावेळी बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी एक वक्तव्य केलं आहे.

मराठा आरक्षणाकरिता बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा  राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray)यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) नोव्हेंबर महिन्यात 10 लाखांचं अर्थसाहाय्य मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांना देण्यात आलं होतं. याबाबत राजेश टोपे यांनी ट्विट करत यादी शेअर केली होती. सतत पाठपुरवठा केल्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटूंबियांना 10 लक्ष वितरण केले, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.

दरम्यान, शुक्रवारी राजेश टोपे यांनी ट्विट करत आज जालना येथे जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सुनील भाऊसाहेब खांडेभराड रा.चिकणगाव ता.अंबड,गणेश नन्नवरे रा.अंतरवली टेंभी ता.घनसावंगी,किरण कृष्णा कोलते रा.गोकुळवाडी ता.बदनापूर बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबातील वारसांना 10 लक्ष रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“किरीट सोमय्या यांना ईडीचा अधिकृत प्रवक्ता घोषित करावं”

मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर…- संजय राऊत

वाद तिरंगा रॅलीचा; सरकार आणि एमआयएममध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

भारती म्हणते, ‘Are We Positive?’; व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More