बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपा युवा मोर्चाचे राजेश टोपेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

सोलापूर | भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर बस स्थानक येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या भरतीची परीक्षा ऐनवेळी रद्द करून विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिल्याचा आरोप करत हिंगोली, परभणी, नगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, पुणे आदी ठिकाणच्या संतप्त विद्यार्थ्यांना सोबत घेत भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे व सुदर्शन यादव यांनी हे आंदोलन केले.

आरोग्य भरती परीक्षेसाठी राज्यातील 8 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यांची परीक्षा शनिवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी होणार होती मात्र आदल्या दिवशी रात्री 10 वाजता परीक्षा रद्द झाल्याची घोषणा राजेश टोपेंनी केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या शहरात पोहचले असताना विद्यार्थ्यांची थट्टा करण्याचे काम सरकारने केले आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या नेत्यांना सामान्य विद्यार्थ्यांचे दुःख कळणार नाही. या दळभद्री सरकारला आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, तातडीने विद्यार्थ्यांची माफी मागून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी यावेळी बोलताना केली.

दरम्यान भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनीही सरकारच्या गलथान धोरणांवर टीका करत राजेश टोपे यांचा निषेध व्यक्त केला. तातडीने परीक्षेची पुढची दिनांक जाहीर केली पाहिजे, आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. येणाऱ्या काळात सरकारने जर यांना न्याय दिला नाही तर भाजयुमो सोलापूर जिल्हा अजून आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशाराही सुदर्शन यादव यांनी यावेळी बोलताना दिला.

दरम्यान, यावेळी जिल्हा सचिव शिलवंत छपेकर, जिल्हा सचिव विशाल जाधव, अशोक कोडम, शरणू हांडे, अनुप कुलकर्णी आदी अनेक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

दिल्ली पुन्हा अव्वल! भेदक गोलंदाजीने राजस्थानला 33 धावांनी धूळ चारली

‘या’ तीन राज्यांना ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्राला देखील अलर्ट जारी

नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ‘इतक्या’ लाखांची वाढ; वाचा नक्की किती आहे संपत्ती

‘मोदी म्हणत असतील, बघ तुझी कशी जिरवली आता घाल…’; अजित पवारांची टोलेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More