Top News

जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ!

वॉशिंग्टन | जो बायडेन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तसेच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे.

शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये होत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या समारंभास उपस्थित आहेत.

डेमोक्रेटिक पक्षाचे सर्व दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. व्हाईट हाऊसमध्ये सुमारे 35 हजार राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आलेत.

डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. राजशिष्टाचार म्हणून ट्रम्प हे या सोहळ्याला उपस्थित राहणं अपेक्षित असतं. मात्र ते अनुपस्थित राहिले.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, ते दोषी आढळल्यास…- शरद पवार

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राज्यातील ‘इतक्या’ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला- छगन भुजबळ

दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती!

“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या