जो बायडन यांनी पुतिन यांना दिला गंभीर इशारा, म्हणाले…
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन आता 40 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. दिवसेंदिवस रशियाने (Russia) युक्रेनवरील हल्ले तीव्र केले असताना युक्रेनने रशियावर खळबळजनक आरोप केला आहे.
युक्रेनची (Ukraine) राजधानी किवच्या जवळ असणाऱ्या बुचा शहरातील सामुहिक कबरीत शेकडो मृतदेह आढळून आले. रशियन सैनिकांनी या नागरिकांची हत्या केली असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे. बुचा येथील घटनेबद्दल बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना थेट इशारा दिला आहे.
बुचा येथील घटनेबद्दल बोलताना बायडन यांनी पुतिन यांचा उल्लेख क्रुर असा केला आहे. बुचामध्ये जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. पुतिन हे युद्ध गुन्हेगार आहेत. व्लादिमीर पुतिन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचा खटला चालला पाहिजे, असा इशारा जो बायडन यांनी दिला आहे.
दरम्यान, युक्रेनला लढत राहण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रे आम्ही देत राहू, असं वक्तव्य जो बायडन यांनी केलं आहे. तर बुचा येथे घडलेल्या युद्ध गुन्ह्यांसाठी खरोखरंच खटला चालवला जाऊ शकतो की नाही, याबद्दल माहिती घेत असल्याचंही जो बायडन म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं होतं हे सर्वांना माहिती”
तेल कंपन्यांचा सर्वसामान्यांना झटका, 13 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
“मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”
मनसेला मोठा धक्का! मुस्लिम कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
78 वर्षांच्या आज्जीने सर्व संपत्ती राहुल गांधींना केली दान, जाणून घ्या कारण
Comments are closed.