वॉशिंग्टन | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांकडे आता सर्वांचंं लक्ष लागलंय. दरम्यान विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आपला विजय होणार असल्याचा दावा केला आहे.
ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावरून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्राध्यक्ष कोण होईल याचा निर्णय देशातील जनता करणार आहे असं बायडन यांनी म्हटलंय.
Power can’t be taken or asserted, it flows from the people, and it’s their will that determines who will be the President of the United States.
— Joe Biden (@JoeBiden) November 4, 2020
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना आपला विजय झाला असल्याचा दावा, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प म्हणाले होते की, खरं सांगायचं तर आम्ही निवडणूक जिंकलीये.
याला प्रत्युत्तर देताना जो बायडेन यांनी एक ट्विट केलंय. बायडेन त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “सत्ता घेतली जाऊ नाही आणि त्यावर दावा देखील करून शकत नाही. ती जनतेकडून मिळते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे ठरवणारी त्यांची इच्छाशक्ती आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच- सचिन सावंत
“…म्हणून शांत बसलोय, वर्दी उतरव आणि ये”; पाहा कुणी दिलं पोलिसाला चॅलेंज
अर्णब गोस्वामींची सुटका की कोठडीत रवानगी???; पाहा न्यायालयानं दिलेला निर्णय
‘राजीनामा देण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये दिले होते’; ‘या’ माजी आमदाराचं वक्तव्य
अमिताभ बच्चन आणि ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत धाव!