Top News विदेश

कोरोना लसीचा धसका!; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल

वॉशिंग्टन | कोरोनाच्या लसीचा अमेरिकेतील लोकांनी धसका घेतल्याचं चित्र आहे. लस घ्यायची की नाही अशा मनस्थितीत लोक असल्याचं पहायला मिळत आहेत, मात्र लोकांच्या मनातील ही भीती दूर व्हावी यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.

७८ वर्षीय जो बायडेन यांनी स्वतः कोरोनाची लस टोचून घेतली आहे. एवढंच नव्हे तर लस टोचून घेताना त्यांनी थेट प्रसारणही केलं आहे. जनतेच्या मनातील भीती कमी व्हावी हा यामागचा उद्देश आहे.

दरम्यान, अमेरिकेत आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. फायझर कंपनीची लस अमेरिकेत उपलब्ध झाली आहे.

जो बायडेन यांनी लस टोचून घेतल्यानंतर एक ट्विट केलं आहे. लस शोधून काढणाऱ्या संशोधक तसेच वैज्ञानिकांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच जसजशी लस उपलब्ध होईल, तशी ती सर्वांनी टोचून घ्यावी, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! लंडनमधून भारतात आलेल्या ‘त्या’ विमानात सापडले कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी

‘तयार रहा… बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात’; तेजस्वी यादवांनी केला गौप्यस्फोट

“मोतीलाल वोरांचं आयुष्य हे जनसेवेचं आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचं आर्दश उदाहरण”

देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे- केंद्रीय आरोग्यमंत्री

…अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या