बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जो बायडन यांचं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता 37 दिवसांचा कालावधी उलटला आहे. या युद्धात रशियाकडून (Russia) सातत्याने होणाऱ्या हल्ल्याने युक्रेनमधील (Ukraine) शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.

रशियाकडून युक्रेनवरील हल्ले तीव्र केले जात आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष या युद्धाकडे लागलेलं असताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

पुतिन यांना युक्रेनमधील परिस्थितीच्या ग्राउंड रियालिटीची योग्य माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे पुतिन यांनी त्यांच्या काही सल्लागारांना काढून टाकले आहे किंवा नजरकैदेत ठेवले आहे, असं वक्तव्य जो बायडन यांनी केलं आहे. तर पुतिन यांना एकटं वाटत असल्याची टिप्पणी अमेरिकेच्या गुप्तचर अहवालातून समोर आली आहे.

दरम्यान, पुतिन यांनी स्पष्टपणे चुकीचं अनुमान लावलं की कमी कालावधीत रशिया हे युद्ध जिंकेल. गेल्या पाच आठवड्यातील ट्रॅक रेकॉर्डवर नजर टाकली तर पुतिन यांनी अनेक चुकीचे निष्कर्ष बांधले आहेत, असंही जो बायडन म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपासही सीबीआय आणि ईडीकडून करण्याची गरज”

पुण्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

भारत-रशियाची वाढती जवळीक; अमेरिकेने भारताला दिला ‘हा’ गंभीर इशारा

मोठी बातमी! मोदी सरकार ‘ही’ पण कंपनी विकण्याच्या तयारीत

मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More