बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांना जो बायडेन यांचा अलर्ट; तात्काळ मायदेशी परतण्याच्या सूचना

नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच, आरोग्य यंत्रणेवर ही मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. देशातील एकूणच परिस्थिती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह बनली आहे आणि वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिका सरकारने एक अलर्ट जारी केला आहे.

भारतात असणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लेव्हल-4 चा अलर्ट जारी केला असून भारतातील एकूण परिस्थिती पाहता अमेरिकेतील नागरिकांनी तात्काळ भारत देश सोडून अमेरिकेत परतण्याच्या सूचना या अलर्टद्वारे देण्यात आल्या आहेत.

एखाद्या देशात दहशतवादी कारवाई सुरू असेल किंवा एखादा देश मोठ्या संकटाला सामोरं जात असेल आणि दुसऱ्या देशातील नागरिक त्या देशात जर असतील तर त्यांची आणि त्यांच्या जीवाची काळजी घेणं ही त्या देशाची प्राथमिकता असते. त्यामुळे अमेरिकेने जो अलर्ट जारी केला आहे, तो त्यांच्या देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित करण्यासाठी केला आहे.

भारतात सध्याची परिस्थिती आहे अशी परिस्थिती यापूर्वीही जगातील इतरही मोठ्या शहरांमध्ये उद्भवली होती. तसेच न्यूयॉर्कमध्येही लोकांच्या घरातून मृतदेह बाहेर काढायची गंभीर परिस्थिती ओढवल्याचे आपण सर्वांनी पाहिलं, त्यामुळे अशा अलर्टची एवढी काही आवश्यकता नव्हती, असं मत भारतातील काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यात कोरोनाचा धोका वाढला; 24 तासात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यु

पृथ्वीच्या वादळाने कोलकाता नेस्तनाबूत, सलग सहा चौकार मारत शॉने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ

देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केलं- देवेंद्र फडणवीस 

मुंबईत कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

“आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More