नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध थांबावं यासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. असं असतानाही रशियाकडून युक्रेनवर होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेन सैनिकांसह शेकडो सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला. तर हजारे जण जखमी झाले आहेत.
रशिया (Russia) दिवसेंदिवस युक्रेनवरील (Ukraine) हल्ले तीव्र करत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियाला झटका देत युक्रेनसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने युक्रेनसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे.
अमेरिकेने युक्रेनला अतिरिक्त 800 दशलक्ष सुरक्षा मदत जाहीर केली आहे. 800 अँटी-एअरक्राफ्ट सिस्टीम, 9 हजार अँटी-आर्मर सिस्टीम आणि 7 हजार लहान शस्त्रे जसं की शॉटगन, ग्रेनेड लाँचर, ड्रोन या सर्व गोष्टी अमेरिका युक्रेनला पुरवणार असल्याची घोषणा जो बायडन यांनी केली आहे.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodomir Zelensyky) यांनी काही दिवसांपूर्वी जो बायडन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत अमेरिकेकडे शस्त्र पुरवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला आर्थिक मदतीसोबत लष्करी मदत करण्याचा देखील निर्णय देखील घेतला आहे.
We’ve announced an additional $800 million in security assistance to #Ukraine. Speaking at White House, US Pres Biden said the new aid package would include 800 anti-aircraft systems, 9,000 anti-armor systems, 7,000 small arms like shotguns & grenade launchers, as well as drones pic.twitter.com/zNrZdBCKSd
— ANI (@ANI) March 16, 2022
थोडक्यात बातम्या-
होळीच्या दिवशी पांढऱ्या कपड्यांना आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या या मागचं खरं कारण
रशियाला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
Comments are closed.