Top News विदेश

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वॉशिंग्टन | गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झालाय. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी झुंज देणारे जो बायडेन या निवडणुकीत 273 मतं घेऊन विजयी झालेत.

निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडेन यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या जनतेने राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याने तो मी माझा बहुमान समजतो, असं बायडेन यांनी म्हटलंय.

बायडेन त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “अमेरिकेने मला राष्ट्राध्यक्ष केलं तसंच आपल्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अमेरिकेपुढे असलेल्या आव्हांनाना मी तुमच्या साथीने सामोरं जाईन. तुम्ही मला ज्या विश्वासाने या ठिकाणी बसवलं आहे तो विश्वास सार्थ करेन.”

या निवडणूकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आता व्हाइट हाऊसमध्ये येत्या काही दिवसातच जो बायडेन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यात यश- उद्धव ठाकरे

“वेब सीरिजच्या नावाखाली चौकट मोडू नका, अन्यथा…”

चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा- उद्धव ठाकरे

जलसंधारण मंत्र्यांच्या भावजयीचा मृतदेह आढळला; नगर जिल्ह्यात खळबळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या