जो बायडन यांच्या तिसऱ्या महायुद्धाबद्दलच्या वक्तव्याने जगाचं टेन्शन वाढलं, म्हणाले…
नवी दिल्ली | 24 फेब्रुवारीला रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) सैन्य कारवाईचे आदेश दिले. रशियाने सैन्य कारवाईची घोषणा करताच रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात झाली. दिवसेंदिवस हे युद्ध तीव्र होत असताना रशिया युक्रेनवर रासायनिक अस्त्रांचा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला होता. (Russia-Ukraine War)
व्हाईट हाऊसने रासायनिक हल्ल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Jo Biden) यांनी तिसऱ्या महायुद्धाबद्दल (World War 3) वक्तव्य करत जगाची चिंता वाढवली आहे. रशियाने युक्रेनवर रासायनिक अस्त्रांचा वापर केला तर रशियाला याची गंभीर किंमत मोजावी लागेल, असा इशारा जो बायडन यांनी दिला आहे.
अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. मात्र, नाटो आणि क्रेमलिन थेट भिडले तर तिसरं महायुद्ध अटळ आहे, असं वक्तव्य जो बायडन यांनी केलं आहे. बायडनच्या वक्तव्यामुळे सर्वांचच टेन्शन वाढलं आहे. तर रशियाला युक्रेनमध्ये कधीही जिंकू देणार नाही, असंही जो बायडन म्हणाले.
दरम्यान, रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियाकडून होणारे बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेन हदरलं आहे. त्यात जो बायडन यांनी तिसऱ्या महायुद्धाबद्दल सूचक वक्तव्य केल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
थोडक्यात बातम्या-
“मला असा संशय येतोय की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे”
Budget 2022: तृतीयपंथीयांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
Budget 2022: छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी जाहीर
‘राऊत आमच्या तरूण भारतमध्ये येतील पण…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
“फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात”
Comments are closed.