बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

मुंबई | कोरोनाचा विळखा राज्यातच नव्हे तर देशभर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत तर काही ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. याशिवाय औषधांची कमतरता तर आहेच. त्यामुळे अनेकांनी आता पुढे येत आपापल्या परीने योगदान द्यायला सुरुवात केली आहे. त्यात काही कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेता जॉन अब्राहमही आता मदतीला पुढे आला आहे.

जॉनेने आगळीवेगळी मदत करायचं ठरवलं आहे. त्यानं त्याचं सोशल मीडिया अकाउंट एका सेवाभावी संस्थेला देऊ केलं आहे. या द्वारे त्या संस्थेला, रुग्णांची तसेच गरजूंची मदत त्याला करायची मदत आहे. सध्या अनेकजन आपल्या अकाउंटवरुन वेगवेगळ्या प्रकारची रुग्णांच्या गरजेची माहिती सोशल मीडियावर शेअर करतात. पण कलाकारांचा फॅनफॉलोइंग हा लाखोंच्या घरात असतो त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचणं शक्य आहे.

‘एक देश म्हणून आपण अतिशय भीषण परिस्थितीतून जात आहोत. प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि लस तर कधी अन्न न मिळणाऱ्या लोकांची संख्या ही वाढताना दिसत आहे. तरीही अशा कठीण परिस्थितीत लोक एकत्र आले आहेत, एकमेकांना आधार देण्यासाठी, मदत करण्यासाठी. तेव्हा आजपासून माझं सोशल मीडिया हे सेवाभावी संस्थेला देत आहे. देशभरातील इतर अनेक संस्था एकत्र येऊन काम करत आहेत. माझ्या अकाउंटवरून केलेल्या पोस्ट या लोकांना लागणाऱ्या वस्तू त्यांना कुठे मिळतील ही माहिती पुरवण्यासाठी आहे’, अशी माहिती जॉनने त्याच्या सोशल मीडियावर दिली आहे.

दरम्यान, माणूसकी दाखवत संकटावर मात करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पुढे येण्याची हीच ती वेळ आहे. जीव वाचवण्यासाठी आणि ही लढाई जिंकण्यासाठी आपण एकत्र असणं गरजेचं आहे. त्यासाठी घरीच राहा, सुरक्षित रहा. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी जबाबदार रहा,  असंही जॉनन लिहीलं आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

 

थोडक्यात बातम्या

कोरोनाने उद्धवस्त केला नवदाम्पत्याचा संसार; अवघ्या तीन दिवसात नवरदेवाला कोरोनाने गाठलं

‘…तर आज ही वेळ ओढावली नसती’; अजित पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

#सकारात्मक_बातमी | हृदयात बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बाळाने कोरोनाला केलं चितपट

“महाराष्ट्र लढवय्या, महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही”

“कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झालेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More