बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त एकच डोस पुरेसा असणाऱ्या ‘या’ लसीला जुलैमध्ये भारतात परवानगी मिळणार?

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला असतानाच देशात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस आणि भारत बायोटेकची लस मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच काही भागांमध्ये रशियाच्या स्पुतनिक-वी या लसीला देखील देण्यास सुरुवात झाली आहे.

त्यातच बहुप्रतिक्षित असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना प्रतिबंधक लस लवकरच भारतीयांना मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकार जुलै महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसी ला परवानगी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लसीचा फक्त एकच डोस कोरोनाला रोखण्यासाठी पुरेसा असल्याचं बोललं जात आहे. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सुरवातीला भारतात या लसीचे 1000 डोस प्राप्त होतील व त्यानंतर मोठा पुरवठा होईल, असं सांगितलं जात आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूचा नवा डेल्टा प्लस हा व्हेरीएंट उदयास आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही लस भारतात येत असल्याने कोरोनामधून काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या लसीची एका डोसची किंमत तब्बल 1 हजार 850 रुपये एवढी असू शकते. दरम्यान, केल्यास खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार की नाही? याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही लस नेमकी बाजारात कधी उपलब्ध होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

फक्त एकच डोस पुरेसा असणाऱ्या ‘या’ लसीला जुलैमध्ये भारतात परवानगी मिळणार?

राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर बेतला! 3 वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेने प्राण गमावले

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मोदी सरकार विरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार? राऊतांनी दिली आतली बातमी

कोरोनाकाळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेत बँकिंग सेक्टरला मात्र अच्छे दिन; नफ्यात दुपटीने वाढ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More