Top News

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

मुंबई | सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा, असा सल्ला शहिद स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नीने दिला आहे.

निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता आणि कायम राहील. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल… अशी भावना वीरपत्नीने व्यक्त करत खोट्या देशभक्तीचा बुरखा अंगावर घेतलेल्यांना त्यांनी सणसणीत चपराक लगावली आहे.

सैन्यात सामील होऊन मग खरा अनुभव घ्या… आम्हाला युद्ध नकोय… युद्धात काय नुकसान होतं हे तुम्हाला माहिती नाही. आता आणखी ‘निनाद’ जाता कामा नये, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे.

आता वीरपत्नीच्या आवाहनानंतर तरी असल्या सोशल मीडियावरून युद्धाच्या पोस्ट बंद होतील, अशी आपण अपेक्षा करूयात…

महत्वाच्या बातम्या-

मी 100 टक्के चौथ्यांदा खासदार होणार, आढळराव पाटलांनी व्यक्त केला विश्वास

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या