Jos Buttler | भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील (T20 Series) दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला (England Team) पराभवाचा सामना करावा लागला. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची (Team India) अवस्था बिकट झाली होती, परंतु शेवटच्या षटकाच्या सुरुवातीलाच भारताने हे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. मालिकेत ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) आपल्या संघाच्या पराभवाचे कारण स्पष्ट केले आणि एका भारतीय खेळाडूला पराभवासाठी जबाबदार धरले.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा केल्या होत्या. भारताने १९.२ षटकांत हे लक्ष्य पूर्ण करून सामना जिंकला. सामन्यानंतर बोलताना कर्णधार बटलरने पराभवाच्या कारणांचा उलगडा केला. तो म्हणाला, “हा एक उत्तम सामना होता. भारताला विजय मिळवून दिल्याबद्दल तिलक वर्माला (Tilak Varma) संपूर्ण श्रेय जाते. आम्ही अनेक संधी निर्माण केल्या, पण तिलक ज्या पद्धतीने खेळला ते कौतुकास्पद होते.”
तिलक वर्मा ठरला पराभवाचे कारण
इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल बोलताना बटलर (Jos Buttler) म्हणाला, “आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावर मी खरोखरच आनंदी आहे. आम्ही काही विकेट्स गमावल्या, पण आवश्यक आक्रमकता दाखवत आम्ही खेळावर नियंत्रण मिळवले आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. मात्र, दुर्दैवाने निकाल भारताच्या बाजूने लागला.”
कर्णधार बटलर पुढे म्हणाला, “आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यावर मी खरोखरच खूश आहे. या सामन्यातून अनेक सकारात्मक बाबी शिकायला मिळाल्या. जेमी स्मिथने (Jamie Smith) पदार्पणात ज्या पद्धतीने खेळ केला तो वाखाणण्याजोगा होता. ब्रायडन कार्सने (Brydon Carse) देखील समाधानकारक कामगिरी केली. आम्ही या खेळण्याच्या शैलीवर खूश आहोत.”
भारतीय फलंदाजी आणि तिलक वर्माचा प्रभाव
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने कर्णधार बटलरच्या ४५ धावांच्या जोरावर २० षटकांत १६५ धावा केल्या होत्या. १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मागच्या सामन्याचा हिरो अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) १२ धावा काढून बाद झाला, तर संजू सॅमसन (Sanju Samson) अवघ्या ५ धावा काढून तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माला मधल्या फळीत इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्यासारखे (Hardik Pandya) अनुभवी खेळाडूही मोठी खेळी करू शकले नाहीत. (Jos Buttler)
Title: jos buttler blames tilak varma for englands defeat