बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्रकाराचं अपहरण करून निर्घृण हत्या; अहमदनगरच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला

अहमदनगर | अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमध्ये दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते असलेले रोहिदास दातीर यांचं अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.

मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहुरीतील मल्हारवाडी रस्त्यावरून पत्रकार रोहिदास दातीर हे घराकडे निघाले असताना काही अज्ञात व्यक्ती तिथे पोहोचले आणि त्यांनी दातीर यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना स्कॉर्पिओ गाडीमध्ये बळजबरी बसवून त्यांचं दिवसाढवळ्या अपहरण केलं.

रोहिदास दातीर यांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन नंतर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि शोध मोहीम सुरू केली. पण पोलिसांच्या तपासाला यश येण्याआधीच मंगळवारी रात्री राहुरी कॉलेज रोडवर रोहिदास दातीर यांचा मृतदेह रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह आढळल्यानंतर रोहिदास दातीर यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाला असल्याचं स्पष्ट झालं.

रोहिदास दातीर हे दक्ष पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते, तसेच पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी राहुरी तालुक्यातील अनेक भ्रष्टाचाराच्या घटनांना वाचा फोडली होती. कदाचित यामुळेच आकस मनात ठेवून त्यांची हत्या झाली असू शकते, असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. एका दक्ष पत्रकारच्या हत्येनं संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे.

थोडक्यात बातम्या

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमित शहा काय देशाचे मालक नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

5 वर्ष शिक्षक अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार; निवृत्त झाल्यानंतर तिच्यासोबतच केलं असं काही…

‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं’; फडणवीसांनी राजेश टोपेंना सुनावलं

मागेल त्याला कोरोनाची लस द्या; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More