मुंबई | मुंबईच्या वांद्रे स्थानकाबाहेर झालेली गर्दी एबीपी माझाचे उस्मानाबादचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्या वृत्तांकनामुळे झाल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ दिग्गज पत्रकार पुढे येऊन आपलं मत मांडत आहे. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी देखील राहुल कुलकर्णी यांची बाजू घेत राहुल यांना झालेली अटक चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
राहुल कुलकर्णी यांना अटक करून महाराष्ट्र सरकारने चूक केली आहे. जी लोकं किंवा चॅनल्स धार्मिक अजेंडा राबवून तश्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात, अशांवर कारवाई व्हायला हवी. राहुल कुलकर्णी यांच्यावर नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. राहुल यांना पाठिंबा देण्यासाठी रवीश कुमार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे.
काही चॅनेल्सने मशीद आणि वांद्रे स्थआनकाबाहेरची गर्दी असं कनेक्शन जोडलं. तर काही चॅनेल्सच्या संपादकांनी देखील तश्या प्रकारचे ट्विटस केले. खरंतर कारवाई त्यांच्यावर व्हायला हवी, असं मत रवीश कुमार यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, बातम्या देताना माणसाकडून चूक होऊ शकते. त्याची शिक्षा ही जेल नाहीये. राहुल कुलकर्णींना पोलिसांनी सोडून द्यायला हवं. त्यांना मोहरा बनवू नये, असंही रवीश कुमार यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
झारीतले शुक्राचार्य कोण आहे? म्हणत पंकजा मुंडे उसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक
सांगली पॅटर्न; विनाकारण घराबाहेर पडाल तर कोलांटउड्या माराल…!
महत्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्रात वेडवाकडं करण्याचा प्रयत्न कराल तर त्याचा भाऊ राज ठाकरे अन् गाठ मनसेशी आहे”
“सरपंच आणि पोलीस पाटलांना 25 लाखांचं विमा संरक्षण द्या”
उद्धव ठाकरे कधीही मंत्री नव्हते पण ते उत्तम प्रशासक- अशोक चव्हाण
Comments are closed.