औरंगाबाद | भाजपने औरंबादामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामधील भाषणे आणि वक्तव्यांपेक्षा हा कार्यक्रम चर्चेत आला आहे तो कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या भाजपच्या नेत्यांच्या कृत्यामुळे. या कर्याक्रमाला उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातील करण्यात येणारे दीप प्रज्वलन सिगारेटच्या लायटरने केलं आहे.
औरंगाबादमधील ‘भगवान कॉलेज ऑफ फार्मसी’मध्ये भाजपच्या वतीने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉफी विथ युवा या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या सुरुवातील दीप प्रज्वलन करण्यासाठी भाजपच्या नेत्यांना वेळेत मेणबत्ती आणि मचीस न मिळाल्याने त्यांनी चक्क सिगारेटच्या लायटरने दिवा पेटवला.
राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी, उपमहापौर विजय औताडे, प्रवणी घुगे हे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दीप प्रज्वलनासाठी सर्व मान्यवर समईजवळ आले त्यावेळी मेणबत्ती आणि माचीस शोधण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करु लागले. काही क्षण गेले तरी कोणीच माचीस अथवा मेणबत्ती न दिल्याने शहराध्यक्ष तनवाणी यांनी खिशातून सिगारेट पेटवण्याचा लायटर बाहेर काढून पुढे होऊन समई प्रज्वलित केली.
महत्वाच्या बातम्या-
“गांधी विचार संपवणारेच सध्या सत्तेत आहेत” – https://t.co/sR6bNkw4yD @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा- शरद पवार- https://t.co/yMx5AqAmpi @Dev_Fadnavis @PawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
“राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला कीड लावायचं काम सुरुय” – https://t.co/AkGI4G9RE4 @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #विधानसभा2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
Comments are closed.