बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जम्बो कोविड सेंटरबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या प्रारंभी काळात अनेक लोक कोरोनाबाधित (Covid – 19)  होत होते. त्यावेळी रुग्णालये आणि कोविड सेंटर देखील (Covid Center) अपूरी पडत होती. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center) उभारली होती. त्यात एका वेळी 3000 पर्यंत लोकांवर उपचार केले जाऊ शकत होते. परंतु आता मागील काही महिन्यांपासून याठिकाणी 10 – 15 टक्क्यांच्यावर रुग्णसंख्या नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता मुंबईतील कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला असून कोरोनाचे रुग्ण कमी आणि दिलासादायक प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे रुग्णांविना ही कोविड सेंटर ओस पडली असल्याने आता ती बंद करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. ही जम्बो कोविड सेंटर येत्या आठवड्याभरात बंद करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांनी दिले आहेत.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रथम रुग्ण सापडला त्यानंतर राज्यसरकार आणि प्रशासनाने योग्य उपाययोजना आणि लसीकरण करत कोरोना परिस्थिती आटोक्यात आणली. मध्यंतरी कोरोना तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने थोडे डोके वर काढत होता, परंतु त्याची दाहकता जास्त नव्हती. रुग्ण घरीच औषधोपचार घेऊन बरे होऊ लागले आहेत. त्यामुळे आता या कोविड सेंटरची एवढी आवश्यक्ता राहिली नाही. ही प्रशासनासाठी आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

दहीसर चेकनाका, कांदरपाडा – 700, मालाड – 2200, नेस्को, गोरेगाव फेज 1- 2221, नेस्को, गोरेगाव फेज 2 – 1500, बीकेसी – 2328, कांजुरमार्ग – 2000, शीव – 1500, आरसी भायखळा – 1000, आरसी मुलुंड – 1708, सेव्हन हिल्स – 1850 येवढ्या क्षमतेची कोविड सेंटर सध्या मुंबईत आहेत. आता त्यांना बंद करण्याची पालिका कार्यवाही करत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची का?’, सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

मॅगझीनसाठी रणवीर सिंग झाला विवस्त्र, न्यूड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो

अंबादास दानवेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…

राष्ट्रपती झाल्यानंतर दौपदी मुर्मूंना मिळणार ‘इतका’ पगार; बंगला आणि गाड्यांसह सुरक्षाही सर्वोच्च

ओबीसी आरक्षणाचे आम्हीच जनक! भाजप-शिवसेनेत श्रेय घेण्यासाठी चढाओढ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More