बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारच्या जम्बो भरतीचं पितळ उघडं, समोर आली महत्त्वाची माहिती.

मुंबई | फडणवीस सरकारने 36 हजार सरकारी पदं भरण्याची घोषणा केल्यामुळे राज्यातील तरुणांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता, मात्र आता याप्रकरणी दिशाभूल केल्याचा आरोप सरकारवर होतोय. 

या भरती प्रक्रियेत सरकारने नवी अट घातली आहे. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख केलाय. ‘यावर्षीची शिक्षण सेवकाच्या भरतीवर पहिली 36 हजार पदं पाच वर्षे मानधन तत्त्वावर असतील. त्यानंतर पात्रता पाहून ती नियमित केली जातील.’

ही पदं कायमस्वरुपी नसल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. 

कोणत्या विभागात किती पदे भरणार?

ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे

आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे

गृह विभाग- 7 हजार 111 पदे

कृषी विभाग- 2 हजार 572 पदे

पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे

सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे

जलसंपदा विभाग- 827 पदे

जलसंधारण विभाग- 423 पदे

मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90 पदे

नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More