बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची ‘इतक्या’ जागांसाठी जम्बो पदभरती

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात परीक्षा, विद्यार्थी, आयोग, भरती यांचा बराच गोंधळ चालू आहे. राज्यात जेवढ्या काही रिक्त पदांसाठी भरती होते ती राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येण्याची जोरदार मागणी विद्यार्थी करत आहेत. अशातच एमपीएससीनं रखडलेल्या पदभरतीला सुरूवात केली आहे. एमपीएससीनं राज्य लोकसेवा दुय्यम परीक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगानं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. आयोगातर्फे सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

राज्य कर निरीक्षक गट-ब या पदाच्या 190 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक गट-ब पदाच्या 376 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या परीक्षेबाबात अधिक माहिती राज्य लोकसेवा आयोगातर्फे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात आयोगाकडून जाहीर झालेली ही तिसरी सर्वात मोठी परीक्षा आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यात आरोग्य भरतीवरून बराच गोंधळ चाललेला असताना एमपीएससीकडून जाहीरात प्रसिद्ध करण्याचा सपाटा लावल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना या सर्वा परीक्षा आयोगाकडून घेतल्या जाव्यात अशी मागणी करत आहेत.

थोडक्यात बातम्या 

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

“आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय”

गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर

“आम्ही अफु-गांजा पिकवूनच आमच्या टेरेसवर ठेवतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More