बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! 20 फूट पाण्यात उडी घेत तरूणाने देशी जुगाड करत 5 महिलांना आणलं मृत्युच्या दाढेतून माघारी

मुंबई | राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून परिस्थिती भीषण होत चालली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही गावं पाण्याखाली गेली आहेत. सरकारी मदत पोहोचत आहे मात्र काही ठिकाणी अद्यापह नागरिक अडकून पडले आहेत. अशाच प्रकारे रत्नागिरीमध्ये एका ठिकाणी मंगेश पवार या तरूणाने जीव धोक्यात घालत 5 महिलांचा जीव वाचवला आहे.

चिपळूणमधील खिर्डी या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगेश चार मजल्याच्या इमारतीत राहतो. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं. त्याच्या घरासमोर घर असलेल्या एका घरात पाच महिला राहतात. हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली अन् पाणी हे पहिल्या मजल्यावरून वर चढू लागलं होतं. त्यानंतर मंगेश आणि त्याच्या मित्रांनी मदतीची मागणी केली मात्र कोणतीही मदत त्यांना मिळाली नाही. त्यानंतर मंगेशने देशी जुगाड केला.

मंगेशने 20 फूट पाण्यात उडी घेत तो महिलांपर्यंत पोहोचला आणि तिथे त्यांना एक दोरी पोहोचवली. त्यानंतर महिलांच्या कंबरेला एक डब्बा बांधला आणि सायकलच्या ट्यूबने त्यांना आपल्या चार मजली इमारतीच्या दिशेने ओढून घेतलं.

दरम्यान, मंगेश पवारच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. मंगेशचा महिलांना रेस्कू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा”

सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ, लवकरच 50 हजारापार जाण्याची शक्यता

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

नागरिकांनो सावधान! देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढतोय

‘टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान भारताला हरवणार’; शोएब अख्तर पुन्हा बरळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More