‘बहिणीच्या लग्नाच्या आधल्या रात्री…’; आमिर खानचा लेक जुनैद खानचा मोठा खुलासा

junaid khan drinking contest with sister ira khan husband

Junaid Khan | बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) सध्या त्याच्या आगामी ‘लवयापा’ (Lavayapa) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट त्याचा थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरणार आहे. दरम्यान, जुनैद त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जुनैदने त्याची बहीण आयराचा (Ira Khan) नवरा लग्नाच्या आदल्या रात्री त्याच्यासोबत होता याचा खुलासा केला आहे.

एका मीडिया (Hauterfly) वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जुनैद खानने आयरासोबत असलेल्या त्याच्या एका खास ‘ट्रॅडिशन’ (Tradition) विषयी सांगितले.

जुनैदच्या म्हणण्याप्रमाणे, त्याचा एक नियम आहे. त्याच्या बहिणीला जो कोणी डेट करेल त्याला एक सोपे काम करायचे आहे. त्या मुलाला घरी यायचे आहे आणि जुनैदसोबत ड्रिंकिंगची स्पर्धा (Drinking Contest) करायची आहे.

या खेळाचा एकच नियम आहे की, दारू हातात घ्यायची आणि १५ मिनिटांत शॉट घ्यायचा. जर तो या खेळात टिकू शकला नाही तर तो हरला. जर त्याने या खेळात जुनैदला हरवले तर सर्व काही ठीक आहे. यामागील कारण स्पष्ट करताना जुनैद म्हणाला की, आयराला हे समजले पाहिजे की तिचा जोडीदार त्याच्या सगळ्यात वाईट परिस्थितीत किती चांगला वागतो. जुनैदने पुढे गंमतीत सांगितले की, त्याला असे जास्त वेळा करावे लागले नाही.

आयराच्या नवऱ्यासोबत रंगली स्पर्धा

आयराचा नवरा नुपूर (Nupur) याच्यासोबत झालेल्या ड्रिंकिंग कॉन्टेस्टबद्दल बोलताना जुनैद म्हणाला की, एक वेळ अशी आली होती की त्याची क्षमता संपली होती. मात्र, नुपूर किती प्रगल्भ आहे हे जुनैदने पाहिले आणि त्यामुळे शेवटचा शॉट त्याने नुपूरला घेऊ दिला आणि त्याला जिंकू दिले. आयराने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला असून तो खूप गोड आहे. (Junaid Khan)

ती रात्र तिथेच थांबली नाही. त्यानंतर नुपूरने संपूर्ण रात्र बाथरूमच्या फ्लोअरवर काढली आणि आयरा त्याच्यासोबत होती. त्यानंतर जुनैदने त्या दोघांना उचलले आणि बेडवर झोपवले. त्यानंतर संपूर्ण रात्र नुपूर जुनैदला मिठी मारत होता.

Title : junaid khan drinking contest with sister ira khan husband

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .