बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वेच्या पुलावर मुलं उभी होती, तेवढ्यात अचानक मालगाडी आली अन्…. पाहा व्हिडिओ!

पाटना | सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओज नवीन असतात तर काही जुनेच व्हिडिओ एका विशिष्ट काळानंतर प्रसिद्धीस येतात. असाच एक बिहारमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमित आलोक या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतियामधला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बिहारच्या बेतियामधील एका रेल्वेच्या अरुंद पुलावर 10 ते 12 मुलं उभी असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर या पुलावर अचानक मालगाडी येते आणि मालगाडी दिसल्यानंतरही ती मुलं बाजूला हटत नाहीत, तर मालगाडी अगदी जवळ आल्यानंतर एकापाठोपाठ एक नदीमध्ये उड्या मारतात. अशाप्रकारच्या जीवघेण्या स्टंटबाजीमुळे अनेकांनी आतापर्यंत आपले प्राण गमावले आहेत. हा व्हिडिओ नदीकिनारी उभ्या असलेल्या त्यांच्याच एका मित्राने आपल्या मोबाईलमध्ये काढला असून रेल्वे चालकाला तुम्ही जा, तुम्ही जा, असं तो या व्हिडीओ मधून बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रेल्वेसमोर अरुंद पुलावर अशी मुलं दिसल्यावर रेल्वेचा चालक नक्कीच घाबरला असणार आणि काही दुर्घटना घडू नये यासाठी तो सारखा हॉर्नही वाजवत होता. परंतु स्टंटबाजीचं भूत अंगात असणाऱ्या या मुलांना जीवाचीही पर्वा नव्हती शिवाय गावातील अनेक लोक किनाऱ्यावरून त्यांचा हा स्टंट मजा घेत बघत होते. कोणत्याही सद्गृहस्थाला त्या मुलांना समजुन सांगावं असं वाटलं नाही.

2020 मध्ये कोरोना काळात लॉकडाऊन असतानाचा हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. रेल्वे प्रशासन नेहमीच सामान्य जनतेला जागृत करते तसेच रेल्वेचे नियम पाळण्यासंदर्भात आवाहन करत असते. त्याचबरोबर नियम मोडणाऱ्या विरूध्द कडक कारवाईही केली जाते. अमित आलोक यांनी हा व्हिडीओ जुलै 2020 मध्ये आपल्या ट्विटर वरून शेअर केला आणि त्यांनी लिहलं की, “अशा प्रकारचे जीव घेणे स्टंट करताना थोडीशी जरी चूक झाली, तर त्या मुलांचा जीव जाऊ शकला असता”.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या – 

गंगुबाईच्या लुकनंतर आलियाचा ‘हा’ लुक होतोय प्रचंड व्हायरल; पाहा आलियाचा नवीन लुक

महागाईचा कहर! आता खाद्यतेलाच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्यांनी वाढल्या

भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले

राज्यात मोठ्या राजकीय घडीमोडी सुरु, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More