बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा

मुंबई | वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा खर्चिक उपाय करताना दिसतात. भलीमोठी रक्कम देत तास-न्-तास जीममध्ये वेळ घालवतात किंवा झटपट वजन कमी करायचं म्हणून महागड्या शस्त्रक्रिया करून घेतात. पण खिशाला कात्री लावणारे हे पर्याय अनेकदा शरीरासाठी घातक ठरतात.

पैसे न घालवता अगदी सहज उपलब्ध होणारे पदार्थही तुमची मदत करू शकतात. काही घरगुती उपायही वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतात. दिवसाची सुरवातच जर हेल्दी ड्रिंकने केली तर त्याने आपण निरोगी राहतो आणि वजन आटोक्यात ठेवायलाही मदत होते.  (Weight Loss Tips)

सकाळी उठताच अनेक जण कोमट पाण्यात लिंबू पिळून पितात यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं. मेथी आणि जीरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे पाणी प्यायले तर वजन कमी होतंच शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मेथी आणि जीऱ्याप्रमाणे बडीशेपचे पाणीही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

ग्रीन टीचा (Green Tea) आहारात समावेश केला तर ते आरोग्यासोबतच त्वचेसाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर ग्रीन टीचं सेवन फायदेशीर ठरतं. हे घरगुती उपाय फायदेशीर असले तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे या पेयांचा आहारात समावेश करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

थोडक्यात बातम्या-

ओमिक्रॉनचे रूग्ण सापडताच पुणे प्रशासन सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; वाचा नेमका वाद काय?

ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More