बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फक्त एक दिवस मुख्यमंत्री करा, जग सलाम करेल असं काम करेन”

सातारा | अभिजीत बीचुकलेंना आपण ओळखतचं असणार तेच बीचुकले जे शिवसेनेचे युवा आणि पर्यावरण मंत्री नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध परळीतून विधानसभेसाठी निवडणूकीला उभे होते. त्यांनी चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुमचे सर्व मंत्री निष्क्रिय आहेत. मला 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री करा, असं म्हणत बिचुकले यांनी पत्राद्वारे आपली इच्छा व्यक्त केली आहे.

नायक चित्रपटातील अनिल कपूरसारखेच अभिजित बिचुकलेंनी एक दिवस मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चित्रपटात अभिनेता अनिल कपूर एका दिवासाकरिता मुख्यमंत्री होतो आणि समाजात वाढलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश आणतो आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो. त्या काळात नायक चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. बिग बाॅसमध्ये देखील बिचुकलेंनी काम केलं आहे.

गेल्या दहा महिने लॉकडाऊन करून आपण कोरोनाला प्रतिबंध केला. असे भासवत असला तरी सर्वसामान्य जनता, श्रमिक, कष्टकरी शेतकरी आणि विशेष करून आम्हा कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे, हे विसरून चालणार नाही. राज्याची मला आस्था असल्याने बेरोजगार, उद्योजक, शेतकरी, कलाकार आणि हातावरचे पोट असलेल्या सर्व लोकांची मला आस्था असल्याने मी पोटतिडकीने आपल्याला सांगू इच्छितो आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झाले आहात. त्याच प्रकारे एक दिवस स्वेच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करा. मग बघा मी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो बघा, असं मत बिचुकलेंनी पत्रात व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले….

अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी

मुलांची आता खैर नाही! पालकांना आता कळणार आपली मुले मोबाईलवर नेमकं काय पाहतात?

‘आपण भाजपमध्ये गेला नसता तर…;’अमोल मिटकरींचा चित्रा वाघ यांना टोला

गुडन्यूज! छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदीत येतोय नवा सिनेमा, ‘हा’ अभिनेता महाराजांच्या भूमिकेत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More