बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त एकच डोस पुरेसा!; ‘या’ लस उत्पादक कंपनीनं भारतासंदर्भात घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. पण कोरोना लसींचा तुटवडा लसीकरण मोहिमेवर परिणाम करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भारतात केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या ‘जाॅन्सन अँड जाॅन्सन’ कोरोना लसीचे उत्पादन करण्यासंदर्भात चाचपणी सुरु झाल्याची माहीती समोर आली आहे.

अमेरिकेत’जाॅन्सन अँड जाॅन्सन’ कोरोना लसीच्या वापराला मंजूरी मिळाली आहे. भारतात या लसीचे उत्पादन करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून सुरु करण्यात आले आहेत, अशी मााहिती अमेरिकेचे गृहसचिव डॅनियल स्मिथ यांनी दिली. भारतातील लस उत्पादक आणि अमेरिकी कंपन्या यांच्यामार्फत संयुक्तपणे या लसीचे उत्पादन करता येणे शक्य आहे का? याबाबत चाचपणी सुरु करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

भारतातील लस उत्पादनात अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स काॅर्पोरेशन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.’जाॅन्सन अँड जाॅन्सन’ कोरोना लसीच्या उत्पादनासाठी या काॅर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक होण्याची शक्यता असून, भारतातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांशी बोलणी सुरु असल्यामुळे लसीचे उत्पादन वेगाने करता येणे शक्य होऊ शकेल. यामुळे 2022 च्या अखेरपर्यंत भारतात 100 कोटी लसींच्या डोसचे उत्पादन होऊ शकेल, असा विश्वास स्मिथ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, कच्च्या मालाची यादी भारत सरकारने दिली आहे. या मालाचा आणि इतर साधनांचा पुरवठा तातडीने करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. मात्र, जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्चा माल भारताला पुरवणे सोपी बाब राहिलेली नाही. भारतासोबत आम्ही या यादीवर काम करत आहोत, असंही स्मिथ यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या –  

“टिकटॅाकसारखे व्हिडीओ बनवा पैसे कमवा”; यूट्यूबची मोठी घोषणा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द; मॅटकडून मोठा निर्णय

राष्ट्रवादीच्या आमदारावरील गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट, आमदारच संशयाच्या फेऱ्यात?

शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईसाठी त्यानं गायलं गाणं, डॅाक्टरलाही रडू कोसळलं

‘…तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते’; बच्चू कडू पंतप्रधान मोदींवर कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More