बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फक्त 2 औषधं घेतली आणि कोरोना बरा झाला’; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा दावा

हैद्राबाद | आपण फक्त दोन प्रकारची औषधं घेतली आणि कोरोनामधून बरे झालो, असा दावा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे. तसेच मीडियाने कोरोनाबात संभ्रम निर्माण केला आणि लोकांमध्ये भीती पसरवली असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

चंद्रशेखर राव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी आपण पॅरासिटामॉल आणि अँटिबायोटीक औषधे खाऊन बरे झालो, असा दावा राव यांनी केला आहे. ते हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

कोरोना नसतानाही सरकारी रुग्णालयामध्ये जागा मिळत होती का? डॉक्टर कधीही रुग्णांना उपचार नाकारत नाहीत. गरिबांवर फक्त सरकारी रुग्णालयामध्येच उपचार होतात हे त्यांना माहिती आहेत. ते रुग्णांना जमिनीवीर बसवतात. तर मीडियामध्ये त्यांचे फोटो दाखवून रुगणांना जमिनीवर झोपायला लावलं असा दावा केला जातो, असा आरोप चंद्रशेखर राव यांनी केलाय.

कोणती वाहिनी किंवा पेपर आहे माहिती नाही पण ते ब्लॅक फंगस आणि यलो फंगसबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. हा फंगस जिवंत आहे की निर्जीव हे देखील लोकांना माहिती नाही. पण लोकं भीतीने मरत आहेत. या टीव्ही मीडियाच्या लोकांना शाप लागेल, असंही चंद्रशेखर राव यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

राजगडावर रोपवे होणार का?; आमदार संग्राम थोपटेंनी दिलं हे स्पष्टीकरण

नाना पटोले तातडीने दिल्ली दरबारी, ‘स्वबळाची भाषा’ कारण?

‘लस न घेतलेल्या आमदारांना विधानसभेत प्रवेश नाही’; बिहार विधानसभा अध्यक्षांचं फर्मान

‘लशींसाठी मोदींचे जाहीर आभार माना’; युजीसीची महाविद्यालयांना अजब सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More