बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील- नितीन गडकरी

नवी दिल्ली | आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला असून यामध्ये गेल्या 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वांत मोठं लक्ष्य आहे. ग्रीन एक्सप्रेसवे कॉरीडोरचं नेटवर्क पूर्णपणे सज्ज आहे. ज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि 30 किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

देशातील सर्व प्रकल्पांवर 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना असेल. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल. सीमेवरील रस्ते बांधण्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केलं जात असल्याचंही गडकरी म्हणाले.

दरम्यान, आगामी पाच वर्षांत टोल वसुली आणि राष्ट्रीय महामार्गांच्या हस्तांतरणाद्वारे बाजारपेठेतून एक लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत असल्याचं गडकरींनी सांगितलं.

थोेडक्यात बातम्या-  

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ‘इतके’ वर्ष लागणार- बिल गेट्स

ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार- देवेंद्र फडणवीस

मी लस घेतली पण फोटो काढून नौटंकी करायला मला आवडत नाही- अजित पवार

‘नवनीत राणा यांनी वेळीच आवाज उठवला असता तर…’; महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येवरून रूपाली चाकणकर आक्रमक

“बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात कुणाचा फायदा होता?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More