बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्या. एन. व्ही. रमणा भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

नवी दिल्ली | देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती व्यंकट उर्फ एनव्ही रमणा यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवन येथे सकाळी 11 वाजता सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते. 23 एप्रिल रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. आता सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांचा कार्यकाल पुढचे 16 महिने असणार आहे.

न्या. एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत न्या. रमणा हे सरन्यायाधीश पदावर असतील, असं सांगितलं जात आहे. 27 जून 2000 साली त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती.

एनव्ही रमणा यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला. 2013 साली त्यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून झाली. 2014 साली रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम सुरु केलं. गेल्या काही वर्षात एनव्ही रमणा यांनी अनेक महत्वपूर्ण खटल्यांचा निकाल दिला.

थोडक्यात बातम्या- 

“लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल”

“खरा सचिन वाझे मंत्रालयावर होता की सिल्वर ओकवर?”

मला डायरेक्ट मेसेज करा, शक्य होईल तेवढी मदत मी करेन- रिया चक्रवर्ती

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल”

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणाले ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More