राहुल फटांगडेसाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul

पुणे | कोरेगाव भीमा हिंसाचारात बळी गेलेल्या राहुल फटांगडेला न्याय मिळावा, यासाठी सोशल मीडिया एकवटलाय. #Justice4Rahul हा हॅशटॅग वापरुन फेसबुक तसेच ट्विटवर अनेकजण व्यक्त होत आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचारात काहीही संबंध नसताना राहुलची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. अंगावर शिवाजी महाराजांचा टी-शर्ट घातलेला होता, त्यामुळे त्याला लक्ष्य करण्यात आलं. राहुल घरात कर्ता होता त्यामुळे त्याच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळलंय. 

दरम्यान, सोशल मीडियावरुन याप्रकरणी सरकारला लक्ष्य केलं जातंय. राहुलच्या जागी राजकारणी, उद्योगपती किंवा एखाद्या श्रीमंताचा मुलगा असता तर लोकप्रतिनिधी आणि माध्यमं गप्प बसली असती का? असा सवाल विचारला जातोय.