सोशल मीडियावर #JusticeForAvni ; सरकार आणि मुनगंटीवार आरोपीच्या पिंजऱ्यात

मुंबई | अवनी वाघिणीच्या मृत्यूला आठवडा उलटला आहे, मात्र हे प्रकरण सरकारच्या चांगलंच अंगलट येताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियात #JusticeForAvni कॅम्पेन सुरु झालं आहे. 

सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. नेटकऱ्यांकडून सध्या प्रश्नांचा भडीमार सुरु आहे. 

अवनीला गोळ्या घालण्यात आल्या त्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. तसेच चौकशी समिती एक फार्स असल्याची टीका देखील केली जात आहे. 

दरम्यान, ट्विटर तसेच फेसबुकवर #JusticeForAvni हॅशटॅग वापरुन अनेकजण व्यक्त होत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल

-अयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच!

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत?; कार्यकर्त्यांनी दानवेंना धारेवर धरलं

-…तर ‘अवनी’च्या मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू!

-सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता; तसं अवनीच्या मृत्यूचं पापही घ्या!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या