बिस्बेन, ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्या दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय तर मिळवलाच, सोबतच ही कसोटी मालिका देखील खिशात घातली. भारतीयांना कमी लेखण्याची चूक ऑस्ट्रेलियाला चांगलीच महागात पडली. खुद्द ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगर यांनी ही बाब बोलून दाखवली.
“भारतीयांना कधी म्हणजे कधीही… कधीही… कधीही… कमी लेखू नका”, असं लँगर यांनी म्हटलं आहे. त्यांनी हे वाक्य असं म्हटलं आहे की भारतीयांना हा व्हिडीओ व्हायरल करण्याचा मोह आवरता आला नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
ही एक जबरदस्त कसोटी मालिका होती, शेवटी कोणतरी हरणार आणि कोणतरी जिंकणार होतं. आज टेस्ट क्रिकेट जिंकलं. ही हार आमच्यासाठी शिकवण तर आहेच मात्र आमच्यासाठी दुखरी जखम देखील आहे जी आम्हाला सलत राहील, असं लँगर म्हणाले.
दरम्यान, भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे आणि त्यातील ११ खेळाडू जर मैदानात असतील तर ते सर्वोत्तमच असतील यात शंका नाही. पहिली गोष्ट म्हणजे कधीच कुणाला कमी नाही लेखलं पाहिजे आणि भारतीयांना तर नाही म्हणजे नाहीच, असंही ते म्हणाले.
पाहा व्हिडीओ-
Never ever, ever underestimate the Indians ! 🇮🇳 pic.twitter.com/ncsXfQoa00
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2021
थोडक्यात बातम्या-
भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात!
“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”
“ये नया भारत है…घर में घुसकर मारता है”
BCCI ने पेटारा उघडला, भारतीय संघाला ‘इतक्या’ कोटींचा बोनस जाहीर
मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे- उदयनराजे भोसले