गुरूग्राम | लॉकडाऊनमुळे कुणी चालत, कुणी सायकलवर तर कुणी मिळेल त्या वाहनानं आपल्या गावाचा रस्ता धरला. मात्र आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून ज्योतिकुमारीनं 1200 किलोमीटरचा प्रवास पार केला.
गुरुग्राम ते दरभंगा या प्रवासात तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. पण आता याच ज्योतिकुमारीच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. वुईमेक फिल्म्स या बॅनरनं ज्योतिकुमारीचा प्रवास पडद्यावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करत पोहोचलेल्या ज्योतीचं खूप कौतुक झालं होतं. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंपनं देखील ट्वीट करत ज्योतीचं कौतुक केलं होतं.
वुईमेक फिल्म या कंपनीनं ज्योतीचा प्रवास चित्रपटाच्या पडद्यावर मांडण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच नाव आत्मनिर्भर असेल असंही सांगण्यात येत आहे. ज्योतीच्या आयुष्याची खडतर गोष्ट आणि तीचा सायकल प्रवास यात रंजक पद्धतीने मांडला जाणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद
महत्वाच्या बातम्या-
कोरोना लसीच्या शोधात अमेरिका आघाडीवर; केलंय हे अचाट काम
‘लालबागचा राजा’चा ऐतिहासिक निर्णय’; यंदा गणेशोत्सव नव्हे तर….