ज्योती मेटेंची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा!

Jyoti Mete | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच शिवसंग्राम अनेक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता एक महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचं वातावरण तापलेलं राहिलं तर शिवसंग्राम पक्षाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत-  ज्योती मेटे

विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. शिवसंग्रामला दोन तपाचा इतिहास आहे. राज्यभरात आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर देखील कार्यकर्ते त्याच उमेदीने कार्य करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढायच की कोणासोबत युती करायची हे काळानुसार ठरवू, असं वक्तव्य ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी केलं आहे.

कोणतीही निवडणूक आणि त्याचा निकाल एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव असाच पहावा लागतो. लोकसभा निवडणूक लढवीत असताना त्याचे समीकरण उमेदवारागणिक बदलले जातात, असं मेटे (Jyoti Mete) यांनी म्हटलंय.

“काही गोष्टी लगेच उघड करायच्या नसतात”

शिवसंग्रामने केवळ बीड लोकसभेपुरता नाही तर राज्यभरात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. खासदार बजरंग सोनवणे यांना फायदा झाला हे त्यांचे मत असू शकते, असं ज्योती मेटे (Jyoti Mete) म्हणाल्या.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जानेवारी महिन्यातच अधिसूचना काढली होती. त्यावर निर्णय घेणं सरकारचं कर्तव्य आहे. शासन म्हणून त्यांनी ते पार पाडलं पाहिजे. राजकारणातल्या काही गोष्टी लगेच उघड करायच्या नसतात, असं ज्योती मेटे (Jyoti Mete) म्हणाल्या.

 महत्त्वाच्या बातम्या- 

“अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायचीये, पण जयंत पाटील ठरतायेत अडचण”

ऐश्वर्या रायच्या अनेक गोष्टी पटत नाहीत, चारचौघात जया बच्चन मनातलं बोलून गेल्या!

जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; त्वचेवरही होतात वाईट परिणाम

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा दाखल नाही

सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी; नाराज छगन भुजबळ म्हणाले…