नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या भूमिकेमुळे मध्ये प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या 19 आमदारांनीही राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे.
काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेट घेतली. गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
दरम्यान, भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवून, त्यांना थेट केंद्रात मंत्रिपद देण्यात असल्याचं कळतंय.
ट्रेंडिंग बातम्या-
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; कमलनाथ सरकारच्या 22 मंत्र्यांचे राजीनामे
पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना!
आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा- जितेंद्र आव्हाड
“अजित पवारांना शपथ घेताना देवेंद्र फडणवीस चांगले वाटले होते”
Comments are closed.