Top News

काँग्रेस आमदाराला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आरोप

भोपाळ | कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहिलेले काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिंदे यांनी आपल्याला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचं सिंघार यांनी सांगितलं आहे.

उमंग सिंघार हे ज्योतिरादित्य यांचे खास होते. आता त्यांनी जे आरोप केले आहेत, त्यावर शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.

सिंघार खरं बोलत आहेत की खोटं? हे शिंदे यांनी सांगायला हवं, असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही निशाणा साधला आहे.

शिवराजसिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकायला हवं. एका मतासाठी त्यांचं सरकार पडलं होतं. ते सिद्धांतवादी होते, असा टोला दिग्विजय यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन लागू!

“अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा”

नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे- रतन टाटा

“निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये”

“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या