नवी दिल्ली | काँगेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँगेसच्या सर्व पदांचा राजीमाना दिल्यानं मध्य प्रदेशमधील काँग्रेसला खिंडार पडलं आहे. मात्र शिंदेंनी राजीनामा दिल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग आणि समर्थन सुरू आहे. अशातच ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है, अशा प्रकारचे मेसेज पाहायला मिळत आहेत.
अठरा वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची असल्याचं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदेेंसोबत काँग्रेसच्या 19 आमदारांनीही राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे.
काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेट घेतली. गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेनंतर सचिन पायलट आणि मिलिंद देवरासुद्धा प्रवेश करणार असल्याचे मेसेज सोशल माध्यामांवर फिरत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; कमलनाथ सरकारच्या 22 मंत्र्यांचे राजीनामे
पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु
महत्वाच्या बातम्या-
ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपत काय मिळणार?, हे पाच आहेत पर्याय
“मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं वाटत नाही”
…म्हणून मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावलं
Comments are closed.