Top News राजकारण

अन् भर सभेत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, काँग्रेसला मत द्या…

मध्य प्रदेश | बिहारप्रमाणे मध्य प्रदेशात देखील निवडणूकीचे वारे वाहू लागलेत. मध्य प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत असून जोरदार प्रचारही सुरु आहे. निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे प्रचारसभा घेत आहेत.

दरम्यान एका सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मत देण्याचं आवाहन केलं. ज्योतिरादित्या शिंदे यांचा हा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला आहे.

या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी हात उंचवत 3 तारखेला होणाऱ्या मतदानावेळी हाताच्या पंजाच्या निशाणी समोरील बटन दाबून काँग्रेसला…मात्र तितक्यात त्यांना चूक समजली अन् भाजपच्या कमळाला मत द्या असं म्हणत सांभाळून घेतलं. मात्र त्यांची ही चूक सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालतेय.

दरम्यान महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. आणि याला ‘आदत से मजबूर’ असा लिहीत शिंदे यांना टोला लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

“काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी, मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचं?”

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकजूट होऊन लढण्याची गरज- नरेंद्र मोदी

फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन लागू!

“अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा”

नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे- रतन टाटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या