बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काबूल हादरलं! विमानतळाजवळ मोठा राॅकेट हल्ला; पाहा व्हिडीओ

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर आता अमेरिका आणि तालिबान यांच्यामधील संघर्ष वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून काबूलमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी काबूल विमानतळाबाहेर मोठा स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यात अमेरिकन सैन्यासह इतर अफगाणी नागरिकांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर आता काबूल विमानतळाजवळ मोठा राॅकेट हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचं रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे. त्यावेळी काबूल विमानतळाजवळ मोठा राॅकेट हल्ला झाला आहे. या रॉकेट हल्ल्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. राॅकेट हल्ला थेट नागरी वस्तीत केल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

काबूल विमानतळाजवळ असलेल्या घरावर रॉकेट आदळलं. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नॉर्थ गेटजवळ हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. काबूल विमानतळावर आणखी एक हल्ला होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला होता. त्यानंतर आता अमेरिकेची माहिती खरी ठरल्याचं दिसत आहे.

दम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात  170 नागरिकांनासह 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेने तालिबानला गंभीर इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर देखील आज हल्ला झाला असल्यानं आता अमेरिका आणि तालिबान यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

एकाच दिवसात तीन पदकं! थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारला कांस्यपदक

निशादची ऐतिहासिक कामगिरी; उंंच उडीत पटकावलं सिल्वर मेडल

अमेरिकेची चिंता वाढली; लष्करी साठ्यावर आता तालिबानचा कब्जा

“भाजप मनसे युती होणं अशक्य, भाजपला मनसेची काय गरज?”

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू; देशभरात संतापाची लाट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More