उरुळी देवाची गावचे रहिवाशी श्रीयुत कचरा डेपो यांचे दुःखद निधन

पुणे | पुण्याचा कचराप्रश्न चांगलाच पेटला असून त्याची झलक आज उरुळी देवाची इथे पहायला मिळाली. उरुळीचे गावचे रहिवासी श्रीयुत कचरा डेपो यांचे दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी मंतरवाडी फाटा येथे होणार आहे, अशी जाहिरातबाजी करत उरुळीच्या ग्रामस्थांनी कचरा डेपोची अंत्ययात्रा काढली.

पुण्यातील कचरा उरुळीत टाकण्यास स्थानिकांचा विरोध आहे, त्याविरोधात  गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या अंत्ययात्रेत खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या.

18274858 1487317181300274 6620915251452708120 n - उरुळी देवाची गावचे रहिवाशी श्रीयुत कचरा डेपो यांचे दुःखद निधन

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या