औरंगाबाद महाराष्ट्र

“रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं”

जालना | भाजप खासदार रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं, टँकर तर माझे नगरसेवक देखील लाऊ शकतात, हे काम त्यांना शोभत नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरणत्याल यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केली.

शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्राचे आणि राज्याचे मिळून 400 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा जालना नगरपालिका नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप रावसाहेब दानवेंनी केला होता.

दानवेंच्या आरोपाला माजी आमदार कैलास गोरणत्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्यृत्तर दिलं.

दरम्यान, दानवेंनी पाणीप्रश्नावर आयोजित बैठकीत महिला नगराध्यक्षांना डावलणे म्हणजे महिलांचा आणि समस्त जालनाकरांचा अपमान असून नगर पालिकेच्यावतीने आम्ही त्यांचां निषेध करतो, असंही गोरणत्याल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो यांना तृणमूल समर्थकांचा घातला घेराव

-इंदापुरातून सुळेंनाच आघाडी; दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसकडे परंपरा- हर्षवर्धन पाटील

-मोदींनंतर साध्वींवर नितीश कुमारही नाराज

-बंगालमध्ये तुफान राडा, भाजप उमेदवाराच्या गाडीची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

-चंद्राबाबू नायडूंनी 24 तासात दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट! हालचालींना जोरदार वेग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या