नवी दिल्ली | महापालिका अधिकाऱ्याला मारहाण करणारे भाजप आमदार आकाश विजयवर्गीयवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आकाशचे वडील आणि भाजपचे सरचिटणीस यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.
पक्ष सर्वोच्च आहे आणि मोदी आमचे नेते आहेत. पक्षाने माझ्या मुलावर कारवाई करावी, असं कैलास विजयवर्गीय यांनी सांगितलं आहे.
पक्षाचा निर्णय कितीही कठोर असला तरी तो स्वीकारण्यास मी तयार आहे, मात्र हा वाद मी संपवू इच्छितो, असं कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या राज्य शाखेने आकाश विजयवर्गीय यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या कृत्याबद्दल स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.
आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर येथील महापालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली होती. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. कुणाचाही पुत्र असो मात्र पक्षाला बदनाम करणाऱ्यांना मी सोडणार नाही, असं मोदी म्हणाले होतेे.
महत्वाच्या बातम्या-
-“राहुल गांधी मैदान सोडून पळणारे पळपुटे आणि भित्रे”
-आयटीच्या मित्रांनो आयुष्य वाया घालवू नका; असं लिहून त्यानं आत्महत्या केली!
-She Is Back, ‘या’ अभिनेत्रीची बिग बाॅस-2 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री
-“आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करायला तयार आहोत पण…”
-विराट शब्दाला जागला; ‘त्या’ आजीसाठी केली ही खास गोष्ट
Comments are closed.