बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली, पण साध्वीने तर त्यांच्या आत्म्याची हत्या केली”

मुंबई | गोडसेने गांधीजींच्या शरीराची हत्या केली. मात्र साध्वीने तर गांधींच्या आत्म्याची हत्या केलीय, असं वक्तव्य नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केलं आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर सारखे लोक अहिंसा, शांती, सहिष्णूता आणि भारताची हत्या करत आहे, असं म्हणत कैलाश सत्यार्थी यांनी साध्वीवर सडकून टीका केली आहे.

भाजपच्या भोपाळच्या उमेदवार प्रज्ञा सिहं ठाकूरने  महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे.

भाजप नेतृत्वाने कोणत्याही फायद्याचा विचार न करता साध्वीसारख्या लोकांना पक्षातून बाहेर काढावं, अशी मागणी कैलाश सत्यार्थी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-चंद्राबाबू नायडूंना ममता दीदींना भेटायचं होतं पण, ममता त्यांना म्हणाल्या…

-निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना!- धनंजय मुंडे

-हे एक दिवस देशाचा तालिबान करतील; आनंद महिंद्रा भाजप नेत्यांवर भडकले

-ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते, राहुल गांधी खोटं बोलत आहेत; मोदींच्या टीकेवर राहुल तोंडघशी!

-मोबाईल आणि सोशल मीडियामुळे युवकांमध्ये सैराट वृत्ती वाढत आहे- नांगरे पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More