अभिनेत्री काजल अग्रवालच्या बाळाचं नाव आहे अगदी खास, पोस्ट शेअर करत म्हणाली…
मुंबई| ‘सिंघम गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री काजल अग्रवाल(Kajal Agarwal) नेहमी आपल्या अभिनयामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तेलूगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून देखील काजलची ओळख आहे.
30 ऑक्टोबर 2020 मध्ये काजल अग्रवालने (Kajal Agarwal) गाैतम किचलुसोबत (Gautam Kitchlu) लग्न केलं. त्यानंतर, काजलने एप्रिल महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला. तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि तेव्हापासून ती सोशल मीडियावर सतत आपल्या गोंडस बाळासोबत नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
तिच्या बाळाची झलक पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक आहेत. तसेच तिच्या बाळाचे नाव काय असेल असा प्रश्न सुद्धा तिच्या चाहत्यांना पडलाय. मात्र काजलने आणि तिच्या नवऱ्याने त्यांच्या लाडक्या लेकाचं खास नाव हे सोशल मीडिया द्वारे जगजाहीर केलं. तसेच दोघांनीही आपल्या मुलाचे नाव ठेवतानाचा आनंद देखील व्यक्त केला.
दरम्यान, ‘निल किचलु’ (Neil Kitchlu) असं काजल आणि गौतम यांनी त्यांच्या छोट्या राजकुमारचं नाव ठेवलं. हे नाव ‘न’ अक्षराने सुरु होतं. काजलने सांगितलं की, निल (Neil) या नावाचा मूळ अर्थ म्हणजे चॅम्पियन किंवा फॅशन! निल किचूलला पाहण्यासाठी नेटकरी कमालीचे आतुर झाले होते. त्यामुळे चाहत्यांची ही उत्सुकता फार काळ न ताणता काजलने तिच्या बाळाचं नाव शेअर केलं. सोबतच तिने तिच्या कुशीत झोपलेल्या तिच्या बाळासोबतचा फोटो पोस्ट केला. ‘निल माझ्यासाठी प्रचंड अनमोल आहे. जेव्हा पहिल्यांदा मी त्याला माझ्या खुशीत घेतलं तो क्षण मी कधी विसणार नाही. त्याला पहिल्यांदा पाहतच क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले’ असंही काजल अग्रवालने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
‘हा तर अपमान आहे’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“मित्रांपासून दूर राहा, आपल्याला विधान परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीये”
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘काम हवं असेल तर या लोकांबरोबर चार दिवस रहावं लागेल’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”
Comments are closed.