…त्या नालायक पंचाला बुटाडानं हाणायला पाहिजे- काका पवार

पुणे | भूगावला झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या अभिजित कटकेने बाजी मारली खरी, मात्र आता या सामन्यात पंचांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात येतोय.

अभिजित कटकेकडून पराभूत झालेल्या सातारच्या किरण भगतचे प्रशिक्षक काका पवार यांनी हा आरोप केलाय. सोबतच अशा नालायक पंचाला बुटाडानं हाणायला पाहिजे, असंही काका पवार यांनी म्हटलंय. 

अभिजितनं किरणला जाणूनबुजून मारलं म्हणजे फाऊल खेळला तेव्हा पंचांनी अभिजितला पॉईंट दिले, असा काका पवार यांचा आरोप आहे. दरम्यान, दोन्ही माझे पैलवान आहेत, मात्र पंचांनी असं करायला नको होतं, असंही काका पवार यांनी म्हटलंय.