सांगली | चितळे उद्योग समूहाचे आधारस्तंभ असलेले काकासाहेब उर्फ दत्तात्रय भास्कर चितळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 78व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. चितळे उद्योग समूहाचे ते आधारस्थंभ म्हणून ओळखले जात होते.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. चितळे उद्योग समूह जगभर प्रसिद्ध आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणं हा चितळे उद्योगसमूहाचा प्रमुख व्यवसाय आहे.
काकासाहेब आणि नानासाहेब या दोन्ही बंधुंच्या रुपात चितळे यांची दुसरी पिढी या उद्योगात आली. काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीत चितळे उद्योगसमूहाची मोठी वाढ झाली.
दरम्यान, हा उद्योग समूह आता केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर जगभरात पसरला आहे. या सर्व कामगिरीचे श्रेय काकासाहेब चितळे यांना दिलं जातं.
ट्रेंडिंग बातम्या-
मला कुणाच्या परवानगीची गरज नाही; राष्ट्रीय वारकरी परिषदेला पवारांचं उत्तर
सीमालढ्यात बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना शहिदाचा दर्जा द्या; एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
महत्वाच्या बातम्या-
“सरकार शेतकऱ्यांविरोधात गेल्यास राजदंडाचा वापर करू”
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका- अजित पवार
पुरोगामी पुण्यात गांधींचा कार्यक्रम रद्द ही लाजिरवाणी घटना; आव्हाड संतापले
Comments are closed.