औरंगाबाद | आज ह्यो दिस बघायला माझा काकासाहेब असायला पाह्यजे होता. त्यो समाजाच्या कामात नेहमी पुढं असायचा…, अशी भावूक प्रतिक्रिया मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या आईने दिली आहे.
त्याला किती आनंद झाला असता… ही बातमी समजल्यावर त्यानी गंज उड्या मारल्या असत्या, अशा शब्दात मीराबाई शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
समाजाच्या कामाला त्यो पहिल्या प्रथम महत्व द्यायचा. त्याला समाजातल्या भावा-बहिणीच्या कामाची लय ओढ होती, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, काल मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण जाहीर केल्यानंतर काकासाहेब शिंदे यांच्या भावाने अशाच काहीशा भावना व्यक्त केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
-“मूका मोर्चा म्हणणारे मराठा आरक्षणाच्या जल्लोषात सामिल कसे काय?”
-अमित शहांनी लोकसभेत मांडले ‘हे’ दाेन महत्वपूर्ण प्रस्ताव!
-मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 10 लाख अन् नोकरी कधी?? चंद्रकांत पाटील म्हणतात…
-जगभरात शमीचं कौतुक; मात्र बायको म्हणते याला लाजच नाही!
-म्हणून लोकसभेत काँग्रेसचा पराभव झाला; ज्येष्ठ नेत्याने दिला पक्षाला घरचा आहेर
Comments are closed.