‘काला’चा टीझर प्रदर्शित, रजनी-नानाची जुगलबंदी

मुंबई | सुपरस्टार रजनाकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटात पहिल्यांदाच रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

निर्माते धनुष यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पा. रंजीत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शक म्हणून पा. रंजीत यांचा चौथाच चित्रपट आहे.

या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण मुंबई, विशेषत: धारावी झोपडपट्टीमध्ये झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या काळाजाला भिडणारा चित्रपट असेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.