FACT CHECK Top News तंत्रज्ञान

कली पुरी यांना २०२० वर्षातील ‘सर्वात प्रभावशाली महिला’ पुरस्कार देऊन सन्मानित

नवी दिल्ली | 2020 या वर्षीतील ‘सर्वात प्रभावशाली महिला’ हा पुरस्कार इंडिया टुडे समूहाच्या उपाध्यक्षा कली पुरी यांना देण्यात आला. 2020 मध्ये कली पुरी यांनी जाहिरात, प्रसारमाध्यम आणि मार्केटिंग क्षेत्रात त्यांनी 50 प्रभावी महिलांमध्ये उच्च स्थान मिळवलं आहे.

हा पुरस्कार भारतातील जाहिरात, प्रसारमाध्यम आणि मार्केटिंग अशा विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय योगदान, प्रेरणादायी नेतृत्व आणि उल्लेखनीय कार्याची ओळख प्राप्त करणाऱ्या महिलांना दिला जातो. या पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. गेल्या सात वर्षांपासून कली पुरी हे प्रभावी महिलांच्या यादीमध्ये आपले स्थान कायम ठेवून आहेत तसेच या यादीत त्यांनी दोनदा आपले स्थान पहिल्या ५ मध्ये कायम राखले होते.

पुरस्कार मिळवल्यावर कली पुरी म्हणाल्या,”एवढा प्रतिष्ठित पुरस्कार मला मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार देणाऱ्या व्यक्तींचे मी आभार मानते, या क्षेत्रातील महिलांच्या सशक्तीकरण आणि त्यांच्या योगदानाला आणि कार्याला एक नवी ओळख मिळत आहे. मी हा पुरस्कार इंडिया टुडे समूहात काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला समर्पित करते, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे इंडिया टुडे आज या स्थानावर पोहोचलेला आहे.”

नुकतेच कली पुरी यांना लंडनमध्ये आयोजित ‘२१ व्या शतकातील आयकॉन अवॉर्ड’ या वार्षिक समारंभामध्ये ‘आऊटस्टँडिंग मीडिया अँड एंटरटेनमेंट अवॉर्ड’ मिळाला होता तसेच ब्रिटिश संसदेतील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा कॉन्फ्लुएन्स एक्सलेन्स अवॉर्डस या कार्यक्रमामध्ये त्यांना ‘इंडियाज मोस्ट पावरफुल वुमन इन मीडिया’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. सध्या कली पुरी अमेरिकेतील बोस्टनमधील हार्वर्ड बिजनेस स्कुलमधून मॅनेजमेंटचा कोर्स करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! “कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांना शंभर टक्के यश”

संशोधकांना मोठं यश; कोरोना संसर्गाचे ‘हे’ सहा प्रकार आणले समोर

कोरोनाच्या औषधाचा दावा अंगलट; न्यायालयाने ‘पतंजली’ला ठोठावला इतक्या लाखांचा दंड

राज्यातील शाळा ‘या’ अ‌ॅपवर भरणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांवर सोपवली मोठी जबाबदारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या